5 May 2011

मन-तरंग : प्रस्तावना


नमस्कार!!
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ह्या ब्लॉग-प्रपंचाला सुरुवात करीत आहे.. म्हणजे, मुद्दामहून मुहूर्त पाहून वगैरे हे केलंय, असं नव्हे. ते तसं सहजच झालंय.. पण, आजच्या दिवशी एखाद्या कामाला सुरुवात केली वा एखादा संकल्प केला, तर तो चिरंतन टिकतो, असं म्हणतात.. आजपासून, नियमितपणे ब्लॉग-लेखन करण्याचा संकल्प करीत आहे.. तो किती काळ टिकतो माहित नाही, पण तो पूर्णत्वाला नेण्याचा मी सतत प्रयत्न करीन.
आपल्या आसपासच्या विश्वात अनेक घटना घडत असतात.. संवेदनशील अशा आपल्या मनावर त्या तरंग उठवून जात असतात.. काळाच्या ओघात ते जुने तरंग लुप्त होत जातात, आणि त्यांची जागा नवीन तरंग घेतात.. अशा या तरंगांना वाहण्यासाठी वाट मोकळी करून देणे, हाच ह्या ब्लॉगचा मुख्य उद्देश आहे..!!
ब्लॉग सुरु करण्यामागे मुख्यत्वेकरून दोन हेतू आहेत.. एक म्हणजे, माझ्या मनातील विचार व  कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवणे.. त्यावरील तुमची मते जाणून घेणे.. आणि  झालंच तर त्यावर चर्चा करणे.. जेणेकरून, आपणा सर्वांच्याच विचारात, समजुतीत प्रगल्भता येईल..  ब्लॉग चे दुसरे उद्दिष्ट मला निर्मळपणे नमूद करावेसे वाटते.. ह्या ब्लॉग-लेखनाने माझे स्वतःचे विचार योग्य रीतीने मांडण्याचा मला सराव होईल.. 
तुमच्या सहकार्याने माझ्या मनातील तरंगांची व्याप्ती वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा करते.. 
असेच वेळोवेळी भेटत जाऊ..
धन्यवाद..!!

No comments:

Post a Comment